दिल एक मंदिर हा १९६३ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो सी.व्ही. श्रीधर दिग्दर्शित आणि राज बलदेव राज यांनी लिहिलेला आहे. या चित्रपटात राजेंद्र कुमार, मीना कुमारी, राज कुमार आणि मेहमूद यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत शंकर-जयकिशन यांचे आहे. या चित्रपटातील सर्व गाणी हिट झाली आणि लोकांना आवडली. हा चित्रपट खूप हिट झाला आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होता. हा चित्रपट श्रीधर यांच्या तमिळ चित्रपट नेंजिल ओर आलयम (१९६२) चा रिमेक आहे, आणि १९६७ मध्ये पाकिस्तानमध्ये इन्सानियत या नावाने रिमेक करण्यात आला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिल एक मंदिर
यामागील विज्ञान आणि इतिहास.