साथी हा १९६८ चा भारतीय हिंदी भाषेतील प्रेमकथा चित्रपट आहे जो सी.व्ही. श्रीधर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला यांच्यासह सिमी गरेवाल, पहारी सान्याल, डेव्हिड अब्राहम चेउलकर, वीणा आणि राम मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर शशी कपूर, नंदा, संजीव कुमार, शबनम, डी.के. सप्रू आणि प्रतिमा देवी यांच्या पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती व्हीनस पिक्चर्सचे एस. कृष्णमूर्ती आणि टी. गोविंदराजन यांनी केली आहे. या चित्रपटाचे संगीत नौशाद यांनी दिले आहे आणि गीते मजरूह सुलतानपुरी यांनी लिहीले आहेत.
साथी ही रवी, शांती आणि रजनी यांच्यातील त्रिकोणी प्रेमकथा आहे. हा चित्रपट १९६१ च्या तमिळ चित्रपट पालुम पझामुम चा रिमेक होता, जो ए. भीमसिंग यांनी दिग्दर्शित केला होता. तो तुर्की भाषेत यारीम कलन सादेत म्हणून १९७० मध्ये रिमेक करण्यात आला होता.
साथी (१९६८ चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.