बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

फेब्रुवारी २०१७ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर एका कसोटी सामना आला होता. हा बांगलादेशचा पाहिलाच भारत दौरा. याआधी हा दौरा ऑगस्ट २०१६ मध्ये आयोजित केला गेला होता, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ केलेल्या इतर आयोजनांमुळे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जाहीर केले की फेब्रुवारीचा पहिला आठवडा कदाचित योग्य आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये सामन्याची तारीख पक्की करण्यात आली. जानेवारी २०१७ मध्ये बीसीसीआयने तारीख एक दिवसाने पुढे ढकलली. कसोटी सामन्याआधी, भारत अ आणि बांगलादेश संघादरम्यान दोन-दिवसीय सराव सामना खेळवण्यात आला.

भारताने सामना २०८ धावांनी जिंकला.

कसोटी सामन्या दरम्यान, भारताने अनेक वैयक्तिक आणि सांघिक विक्रम नोंदवले. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली ह्या दोघांनीही वैयक्तिक फलंदाजी विक्रम नोंदवले. पुजाराने १,६०५ धावा करून, भारतीय प्रथमश्रेणी मोसमातील सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम नोंदवला. ह्या आधीचा विक्रम १९६४-६५ साली १,६०४ धावांसाहित चंदू बोर्डे यांच्या नावावर होता. १,१६८ धावांसहित, घरच्या मोसमातील सर्वाधिक धावांचा विक्रम कोहलीने स्वतःच्या नावावर केला.{याआधीचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर होता, त्याने २००४-०५ मध्ये १,१०५ धावा केल्या होत्या. त्याशिवाय सलग चार कसोटी मालिकांमध्ये चार द्विशतके करणारा कोहली हा पहिलाच खेळाडू ठरला. ह्या आधीचा सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतके करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांच्या नावे होता. रविचंद्रन अश्विनने सर्वात जलद २५० कसोटी बळी घेण्याचा विक्रम केला. डेनिस लिलीचा ४८ कसोटी सामन्यांचा विक्रम त्याने ४५ कसोटी सामन्यांत २५० बळी घेऊन मोडला.

भारताने पहिल्या डाव ६८७ धावांवर घोषित केला आणि कसोटीमध्ये सलग तीन डावांमध्ये ६०० पेक्षा जास्त धावा करण्याचा सांघिक विक्रम केला. ह्या कसोटी सामन्यातील विजयामुळे त्यांनी सलग सहा मालिका विजय मिळवले. ह्या विजयी मालिकेची सुरुवात सप्टेंबर २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झाली. बांगलादेशविरुद्धच्या ह्या मालिकाविजयामुळे, कर्णधार म्हणून सलग १९ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला.

मुशफिकुर रहिम हा कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण करणारा चवथा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू ठरला. सामना पूर्ण होता-होता, हबीबुल बशरला मागे टाकून, तो बांगलादेशचा तिसरा सर्वाधिक कसोटी धावा जमवणारा फलंदाज झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →