इंग्लंड क्रिकेट संघ ऑक्टोबर २०१६ मध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर तीन एकदिवसीय, दोन कसोटी आणि तीन सराव सामने खेळण्यासाठी आला होता.
दौरा सुरू होण्याच्या अवघ्या चार महिन्यांआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संघामधील खेळाडूंकडून सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली गेली, त्याचे पर्यावसन दोन खेळाडूंनी दौऱ्यामधून अंग काढून घेण्यात (ज्यामध्ये मर्यादित षटकांचा कर्णधार आयॉन मॉर्गन आणि सलामीवीर ॲलेक्स हेल्सचा समावेश होता) झाले.
इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. पहिल्या कसोटीमध्ये २२ धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागलेल्या बांगलादेश संघाने दुसरी कसोटी १०८ धावांनी जिंकली आणि त्यांचा इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी विजय नोंदवून कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. बांगलादेशचा कर्णधार, मुशफिकुर रहिम म्हणाला, "बांगलादेश क्रिकेटसाठी हा एक खूपच मोठा क्षण आहे". पराभवाच्या उत्तरादाखल इंग्लंडचा कर्णधार अलास्टेर कुक म्हणाला "मला हे बोलणं सोपं नाहीये, पण बांगलादेश क्रिकेट साठी हा एक चांगला विजय आहे".
इंग्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१६-१७
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!