वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये विस्डेन ट्रॉफीसाठी तीन-कसोटी आणि त्याशिवाय एक ट्वेंटी१० आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला.
कसोटी मालिकेआधी, वेस्ट इंडीजचे डर्बीशायर, एसेक्स आणि केंट विरुद्ध प्रथम श्रेणी सराव सामने खेळवण्यात आले. तसेच लीस्टरशायर संघाला २०१७ नॅटवेस्ट टी२० ब्लास्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान न मिळाल्याने, लीस्टरशायर आणि वेस्ट इंडीज दरम्यान दोन दिवसीय सामना खेळवण्यात आला.
ऑक्टोबर २०१६ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) पुष्टी दिली की एजबॅस्टन येथील पहिली कसोटी दिवस/रात्र म्हणून खेळली जाईल. ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले की, "आम्ही आपल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या आयोजनासाठी उत्साहित आहोत". एजबस्टन कसोटी सामन्यानंतर वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलास्टेर कुक आणि नील स्नोबॉल यांनी सांगितले की, इंग्लडमध्ये आणखी एक दिवस / रात्र कसोटी आयोजित करण्याच्या बाबतीत "ज्यूरी विचार करत आहेत". ईसीबीने ह्याकडे यश म्हणून पाहिले आणि म्हणून दर वर्षी एक दिवस / रात्र कसोटी ठेवण्याची एक शक्यता व्यक्त केली. इंग्लंडने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली, ज्यात जेम्स अँडरसनने तिसऱ्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील ५०० बळी पूर्ण केले.
वेस्ट इंडीजने एकमेव टी२० सामना २१ धावांनी जिंकला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात, इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला, त्यामुळे वेस्ट इंडीजला क्रिकेट विश्वचषक, २०१९ स्पर्धेत थेट प्रवेशाचे दरवाजे बंद झाले आणि आता त्यांना पात्रतेसाठी २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता लढणे भाग पडले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर ब्रिस्टल येथे बेन स्टोक्सला अटक झाल्याने इंग्लंडच्या चवथ्या एकदिवसीय सामन्याच्या तयारीत अडथळा आला. ह्या घटने नंतर स्टोक्स आणि अॅलेक्स हेल्स दोघांनाही इसीबीने निलंबीत केले, म्हणजेच पुढील सुचनेपर्यंत त्यांना खेळण्यास मज्जाव करण्यात आला. ह्यानंतरही, इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!