प्रा. फ. म. शहाजिंदे (फकीरपाशा महेबूब शहाजिंदे) (F. M. Shahajinde) (ایف. ایم شاہجندی) महाराष्ट्रातील एक ग्रामीण कवी आहेत. मराठवाडी भाषा त्याच्या साहित्याचा महत्त्वाचा गाभा राहिला आहे. ३ जुलै १९४६ साली उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव फकीरपाशा महेबूब शहाजिंदे असं आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामच्या वेळी रझाकारांनी सशस्त्र उठाव केला. ज्या निजाम सरकारविरोधी अनेक बंडखोर मारले गेले. यानंतर सूड म्हणून हिंदूू समुदायाची दंगल उसळली ज्यात हल्लेखोरांनी शहाजिंदे यांच्या वडिलांवर हल्ला केला, या हल्ल्यात त्यांच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका हिंदू कुटुंबाने त्याच्या आई व इतर कुटुबांचे संरक्षण केले.
फ. म. शहाजिंदे यांची ‘निधर्मी’ आणि ‘आदम’मधील कविता क्रांतिकारकरीत्या विद्रोही आणि ज्या व्यवस्थेने येथील मुसलमानांचे जगणे कठीण करून सोडले आहे, त्या व्यवस्थेला व त्याच्या इतिहासाला आणि वर्तमानाला आव्हान देणारी कविता आहे. त्यांच्या कविता जशा नव्या वाटा शोधणाऱ्या आहेत, तशाच नव्या वाटा प्रस्थापित करणाऱ्या आहेत. शहाजिंदेच्या कवितेमधून व्यक्त होणारा विद्रोह आक्रस्ताळी नसून या व्यवस्थेला अस्तित्वाच्या आत्मसामर्थ्याने आणि येथील मातीने दिलेल्या सार्थ आत्मविश्वासाने आव्हान करणारा आहे.
फ.म. शहाजिंदे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.