मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे मुसलमान मराठी साहित्यिकांनी भरवलेले साहित्य संमेलन होय. इ.स. १९९० साली २४ व २५ मार्चला सोलापूरला या नावाचे पहिले संमेलन भरले. प्रा. फ.म. शहाजिंदे हे संमेलनाध्यक्ष होते.

महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाव, संधी, प्रोत्साहन व प्रेरणा मिळत नाही. ही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी अनुभवलेल्या जीवनातल्या चढ-उतारांचे यथार्थ वास्तव चित्रण आपल्या लेखनातून करावे, यासाठी हे संंमेलन भरते.

ही संमेलने मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ भरवते, त्यासाठी १९८९ साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे, इकबाल मिन्ने, अजिज नदाफ, ए.के.शेख, मुबारक शेख, अब्दुल लतीफ नल्लामंदू यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.

स्थापनेेेेपासूून परिषदेने सात संमेलने घेतली. सोलापूर, नागपूर, रत्‍नागिरी, मुंबई, पुणे, सांगली आणि औरंगाबाद शहरात ही संमेलने झाली. २००९ साली औरंगाबादला झालेले परिषदेचे शेवटचे संमेलन होते. या संमेलनाअगोदर परिषदेची बैठक झाली त्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि नवीन कार्यकारिणी निर्माण झाली. त्यात डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली, पण १८ वर्षे सचिव असणाऱ्या अजीज नदाफना कुठलेच पद मिळालेले नव्हते, यावरून नाराज होऊन त्यांनी साहित्य परिषदेच्या कार्यपद्धतीवर टीका केली . पण संमेलन पार पडले. पण परिषदेच्या सदस्यांमध्ये बेबनाव वाढला. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे काम थांबले.

त्यानंतर २०१०मध्ये डॉ. इकबाल मिन्ने यांच्या पुढाकाराने मुस्लिम मराठी परिषदेच्या काही सदस्यांनी मिळून औरंगाबादमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलने मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ नावाचे मंडळ स्थापन केले. या मंडळाकडून प्रथमच नववे साहित्य समंलेन सांगली येथे घेण्यात आले.

संमेलनाला नदाफ यांनी विरोध दर्शवला. पण 'मुस्लिम मराठी साहित्य व सास्कृतिक मंडळाच्या बॅनरखाली हे संमेलन घेण्यात येत होते तेव्हा विरोधाचा सूर मावळला. पण बेन्नूर आणि नदाफ वगळता सारेच सदस्य आणि मुस्लिम मराठी साहित्यिक यात हिरिरीने सहभागी झाले, त्यामुळे सांगलीचे संमेलन 'नववे' अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन म्हणून सर्व साहित्यिकांनी मान्य केले. डॉ. शेख इकबाल मिन्ने 'मुस्लिम मराठी साहित्य व सास्कृतिक मंडळा'चे संस्थापक अध्यक्ष आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →