फिल्मफेर पुरस्कार

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फिल्मफेर पुरस्कार

फिल्मफेर पुरस्कार (इंग्लिश: Filmfare Awards) हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी द टाइम्स समूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेर अवॉर्ड्‌स असे झाले.

१९५६ सालापासून फिल्मफेर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जात आहे. फिल्मफेर पुरस्कारांची तुलना अनेक वेळा हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कारांसोबत केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →