कुमार सानू

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कुमार सानू

केदारनाथ भट्टाचार्य ऊर्फ कुमार सानू (बंगाली: কুমার শানু ) (सप्टेंबर २३, १९५७ - हयात) हा बंगाली पार्श्वगायक आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. कुमार सानूने प्लेबॅक कारकीर्द सानू भट्टाचार्य या नावाने सुरू केली. १९८६ मध्ये, शिबली सादिक दिग्दर्शित त्यांना पहिला बांग्लादेशी चित्रपट 'तीन कन्या' मिळाला. हिरो हिरालाल (१९८९)) या हिंदी चित्रपटामध्ये बॉलीवूडचे पहिले गाणे गायले होते. १९८९ मध्ये जगजितसिंग यांनी कुमार सानूची ओळख मुंबईतील कल्याणजी-आनंदजीशी केली. त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आपले नाव "केदारनाथ भट्टाचार्य" वरून "कुमार सानू" केले कारण कुमार सानू यांच्या आवाज आणि गाण्यांच्या शैलीवर किशोर कुमार यांचा जास्त प्रभाव होता.त्यानंतर कुमार सानू मुंबईत स्थायिक झाले तिथे त्यांना कल्याणजी-आनंदजींनी जादूगर या चित्रपटात गाण्याची संधी दिली.१९९० च्या ‘आशिकी’ या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक नदीम-श्रावण यांनी सानूला एका गाण्याशिवाय इतर सर्व गाण्याची संधी दिली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →