प्रणब मुखर्जी (बांग्ला: প্রণব মুখোপাধ্যায় ; रोमन लिपी: Pranab Mukherjee) (११ डिसेंबर, इ.स. १९३५- ३१ ऑगस्ट २०२०, नवी दिल्ली) हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.
भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. भारत सरकारने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.
प्रणब मुखर्जी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?