पूजा रानी बोहरा (१७ मार्च, १९९२:निमरीवाली, भिवनी जिल्हा, हरयाणा, भारत - ) ही एक भारतीय मिडलवेट मुष्टियोद्धा आहे. ती २०१९ आणि २०२१ची आशियाई विजेता आहे. तिने २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत ७५ किॅग्रॅ वर्गात कांस्यपदक जिंकले. तसेच २०१६ दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय पूजा रानीने २०१२ आशियाई स्पर्धेत तर २०१५मध्ये कांस्यपदक जिंकले. तिने ग्लासगो राष्ट्रकुल खेळांत मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पूजा रानी ७ वेळा राष्ट्रीय विजेती होती तिने २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पूजा रानी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.