लवलिना बोर्गोहेन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

लवलिना बोर्गोहेन (२ ऑक्टोबर, १९९७) ही एक भारतीय हौशी मुष्टियोद्धा आहे. तिने २०२० तोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. मेरी कोम आणि विजेंद्र सिंगनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मुष्टीयुद्धात पदक मिळवणारी ती तिसरी भारतीय आहे. तिने २०१८ आणि २०१९ साली एआयबीए महिला जागतिक मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप एआयबीए महिला जागतिक मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.

बोर्गोहेनने नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक आणि गुवाहाटीमध्ये झालेल्या दुसऱ्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि ६९ किलो वेल्टरवेट श्रेणीत तिने तिसरे स्थान मिळवले.[१] Archived 2020-03-20 at the वेबॅक मशीन.

लवलिना ही आसाम राज्यातून ऑलिम्पिसाठी पात्र ठरलेली पहिली महिला आहे. आणि शिवा थापा यांच्यानंतर राज्यातून देशाचे प्रतिनिधित्व करणारी दुसरी मुष्टियोद्धा आहे. 2020 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारी ती आसाममधील सहावी व्यक्ती ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →