निखत झरीन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

निखत झरीन

निखत झरीन (१४ जून, १९९६:निजामाबाद, तेलंगणा, भारत - ) ही भारतीय हौशी महिला मुष्टीयोद्धा आहे. २०११ मध्ये अंताल्या येथे एआयबीए महिला युवा आणि कनिष्ठ जागतिक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. २०१९ मध्ये, बँकॉकमध्ये आयोजित झालेल्या थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत झरीनने रौप्यपदक जिंकले. २०१६ मध्ये आसाममध्ये झालेल्या १६ व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. २०२२ मध्ये, इस्तंबूल, तुर्कस्तान येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत निखतने फ्लायवेट गटात थायलंडच्या जुटामास जितपोचा अंतिम फेरीत पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →