चिंकी यादव (२६ नोव्हेंबर १९९७, भोपाळ, मध्य प्रदेश) ही एक भारतीय नेमबाज आहे. ती २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेते. तिने २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरून २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताकरता कोटा मिळवला. मार्च २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत चिंकीने २५ मीटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच राही सरनोबत आणि मनू भाकर यांना हरवत सुवर्ण पदक पटकावले. याच स्पर्धेत राही सरनोबत आणि मनू भाकर यांच्यासह तिने २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चिंकी यादव
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.