पूजा ढांडा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पूजा ढांडा

पूजा धांडा (जन्म: १ जानेवारी १९९४) ही हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बुदाना गावातील एक फ्रीस्टाईल कुस्तीगीर आहे. पूजाने बुडापेस्ट येथे झालेल्या २०१८ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये ५७ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले होते. तिने २०१० च्या उन्हाळी युवा ऑलिम्पिकमध्ये आणि २०१८ मध्ये गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये अनुक्रमे ६० किलो आणि ५७ किलो वजनगटांत रौप्य पदके जिंकली.२०१४ च्या आशियाई कुस्ती स्पर्धेतही तिने कांस्य पदक जिंकले होते. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्कारने गौरविले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →