साइखोम मीराबाई चानू

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

साइखोम मीराबाई चानू

साइखोम मीराबाई चानू (८ ऑगस्ट, १९९४ - ) ही एक भारतीय भारोत्तोलक (वेट लिफ्टर) आहे. तिने २०२० तोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ४९ किलो गटात रौप्य पदक जिंकले. मीराबाई चानूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि अनेक पदके जिंकली आहेत.

खेळातील योगदानाबद्दल तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०१८ मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न देऊन तिला सन्मानित केले.

चानूने २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ग्लासगो येथे महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले; गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेच्या २०१८ च्या आवृत्तीत सुवर्णपदकाच्या मार्गावर तिने विक्रम मोडला. २०२० उन्हाळी ऑलिंपिकपूर्वी, २०१७ मध्ये तिची सर्वात मोठी कामगिरी झाली- तिने अनाहिम, कॅलिफोर्निया येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →