रवी कुमार दहिया (१२ डिसेंबर १९९७) हा भारतीय फ्री स्टाईल कुस्तीगीर आहे ज्याने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो गटात रौप्य पदक जिंकले. तो रवी कुमार म्हणूनही ओळखला जातो. तो हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा आहे. दहिया हा 2019च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता आहे, तसेच त्याने दोन वेळा आशियाई चॅम्पियन स्पर्धा देखील जिंकली.
भारत सरकारने 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान देऊन रवीचा गौरव केला.
रवी कुमार दहिया
यामागील विज्ञान आणि इतिहास.