नीरज चोप्रा हे भारतीय भाला फेक पटू आहेत. ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत त्याने जगभरातील प्रमुख स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके गोळा केली आहेत. २०२० तोक्यो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकले. नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे.त्याने फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१३ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर 'दोहा डायमंड लीग'मध्ये भालाफेक मध्ये ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नीरज चोप्रा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!