अन्नू राणी

या विषयावर तज्ञ बना.

अन्नू राणी धारायण (२८ ऑगस्ट, १९९२:मेरठ, उत्तर प्रदेश, भारत - ) ही एक भारतीय मैदानी खेळाडू आहे. ही भालाफेक स्पर्धेत भाग घेते. २०१९मध्ये दोहात झालेल्या जागतिक मैदानी खेळ विजेतेपद स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये महिलांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय होती तिने २०२० तोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

अन्नू राणीने २०२० बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळांध्ये कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक ही जिंकणारी पहिली भारतीय महिला भालाफेकपटू आहे. चीनच्या हांग्झू शहरात झालेल्या २०२३ आशियाई खेळांत तिने सुवर्णपदक जिंकले. या खेळप्रकारात सुवर्णपदक ती पहिली भारतीय भालाफेकपटू आहे.

अन्नू राणीते आपल्या कारकिर्दीत ६३.२४ मी (२०७+ फूट) इतका लांब भाला फेकला आहे.

अन्नू राणीचे वडील अमरपाल हे शेतकरी होते. भावंडांशी क्रिकेट खेळताना तिच्या भावाने तिच्या हातातील आणि खांद्यातील ताकद पाहून तिला शेतातील उस फेकून दाखवण्यास सांगितले. तिची अचाट फेक पाहून उपेंद्र तिला प्रशिक्षण देऊ लागला. उस फेकून झाल्यावर अन्नू राणीने एका आपल्यासाठी स्वतःच एक बांबू तासून भाला बनविला. खेळातील नियमानुसार माप व वजनाचा भाला घेण्याची त्यांची ऐपत नव्हती तरीही तिने असेच प्रशिक्षण चालू ठेवले. खेळात मुलीने वेळ घालवलेला तिच्या वडीलांना आवडत नव्हते. त्यामुळे अन्नू राणीच्या भावाने तिला प्रशिक्षणासाठी पैसे आणि इतर मदत केली. शेवटी २०१४मध्ये अन्नू राणीने भालाफेकीतील राष्ट्रीय विक्रम मोडल्यावर अमरपाल यांनी अन्नू राणीला मदत करणे सुरू केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →