शिवपाल सिंग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सार्जंट शिवपाल सिंग ( ६ जुलै, १९९५) हा भारतीय मैदानी खेळाडू आहे. हा भालाफेक स्पर्धांमध्ये भाग घेतो. सिंग हा भारतीय वायुसेनेत सार्जंट या वरिष्ठ नॉन-कमिशन्ड ऑफिसरपदावर (SNCO) आहे.

सिंगने २०१८ आशियाई खेळांमध्ये त्याने आठवे स्थान मिळवले तर २०१९ आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

सिंगने २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

बंदी घातलेले पदार्थ सेवन केल्याबद्दल सिंगला चार वर्षांसाठी खेळातून निलंबित केले गेले आहे. हे निलंबन १० ऑक्टोबर, २०२५ पर्यंत असेल.

शिवपाल सिंग उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील धनापूर ब्लॉक अंतर्गत हिंगुटरगढ गावात राहतो. त्याचे वडील, काका शिवपूजन सिंग आणि जगमोहन सिंग हे देखील भालाफेक करणारे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →