प्रियांका गोस्वामी (१० मार्च, १९९६:मुझफ्फरपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) ही एक भारतीय मैदानी खेळाडू आहे. ही १० किमी आणि २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भाग घेते. तिने तोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथे ती १७व्या व्या स्थानावर आली. तिने २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १० किमी चालण्यात रौप्य पदक जिंकले होते. १० किमी स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
मैदानी खेळांत जाण्याआधी गोस्वामी जिम्नॅस्टिक्स शिकत होती. मैदानी खेळाडूंना जिंकल्यावर मिळणाऱ्या बक्षीसाची रक्कम पाहून ती मैदानी खेळांमध्ये आली.
फेब्रुवारी २०२१मध्ये तिने २० किमी शर्यत १:२८:४५ मध्ये जिंकूननवीन भारतीय विक्रम रचला. यानेच ती २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र ठरली. तिने यापूर्वी २०१७ स्पर्धा जिंकली होती
ती भारतीय रेल्वेमध्ये काम करते.
प्रियांका गोस्वामी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?