पुरी गांधीधाम एक्सप्रेस ही पश्चिम रेल्वेची अतिजलद रेल्वेगाडी आहे. ती भारत देशाच्या ओरिसा राज्यातील पुरी ते गुजरात राज्यातील गांधीधाम पर्यंत आठवड्यातून एकदा धावते. या ट्रेनची घोषणा सन २०११ च्या अंदाजपत्रकात झाली आणि ही १४ नोव्हेंबर २०११ रोजी धावू लागली. या गाडीचा क्रं. १२९९३/१२९९४ आहे. ही गाडी प्रत्यक शुक्रवारी गांधीधाम पासून निघते आणि रविवारी पुरी येथे पोहचते तर ती सोमवारी पुरी येथून निघते आणि बुधवारी गांधीधाम येथे पोहचते. ही गाडी ओरिसा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांत एकूण २३ थांबे घेत एकूण २,२८३ किमीचा (१४१९ मैल) प्रवास करते. त्या प्रवासासाठी ती सरासरी ४१ तास ३० मिनिटे घेते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुरी−गांधीधाम एक्सप्रेस
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.