गीतांजली एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते कोलकाता दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. भारत देशाचे पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता ( हावडा रेल्वे स्थानक) आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस) या दोन शहरादरम्यान धावणारी पूर्व-पच्छिम भारताला जोडणारी दैनंदिन धावणारी अती वेगवान (सुपर फास्ट) ही ट्रेन आहे. या ट्रेनचा पूर्ण प्रवास १९६८ किमीव सरासरी वेळ ३० तास ३० मिनिटे आहे. या ट्रेन मध्ये वातानुकूलित, शयनयान, सामान्य, बैठक व्यवस्था असणाऱ्या बोगी आहेत. खर्च करून खानपान व्यवस्था होऊ शकते. रुळाचे गेज १६७६ मिमी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गीतांजली एक्सप्रेस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?