हावडा मुंबई मेल ही भारतीय रेल्वेची नागपूर मार्गे मुंबई ते कोलकाता दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. भारत देशाचे पश्चिम बंगालचीराजधानी कलकत्ता ( हावडा रेल्वे स्थानक) आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस) या दोन शहरादरम्यान धावणारी पूर्व-पच्छिम भारताला जोडणारी दैनंदिन धावणारी अती वेगवान (सुपर फास्ट) ही ट्रेन आहे. या ट्रेनचा पूर्ण प्रवास १९६८ किमीव सरासरी वेळ ३३ तास १५ मिनिटे आहे. या ट्रेन मध्ये वातानुकूलित, शयनयान, सामान्य, बैठक व्यवस्था असणाऱ्या बोगी आहेत. रुळाचे गेज १६७६ मिमी आहे.
हा हावडा जंक्शन ते मुंबई मार्गावरील ट्रेन क्रमांक १२८१० आणि उलट दिशेने १२८०९ क्रमांकाचा रेल्वे नंबर म्हणून चालते .
हावडा–मुंबई मेल
थोडक्यात पण महत्त्वाचे.