इतवारी जंक्शन रेल्वे स्थानक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इतवारी जंक्शन रेल्वे स्थानक

ईतवारी हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक व जंक्शन आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले ईतवारी रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे. येथे ६ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे ८ गाड्या थांबतात.येथून १० रेल्वे गाड्यांची सुरुवात होते व १० रेल्वे गाड्या येथे टर्मिनेट होतात.हे रेल्वेचे नागपूर नागभीड नॅरो गेज मार्गावरील एक स्थानकही आहे. येथून कोराडीला एक फाटा जातो.

नागपूर शहरातील पाच रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या या स्थानकातून इतवारी टाटानगर पॅसेंजर गाडी निघते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →