तमिळनाडू एक्सप्रेस ही भारताच्या नवी दिल्ली आणि चेन्नई शहरांच्या मध्ये धावणारी अतिजलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी ऑगस्ट ७, इ.स. १९७६ रोजी सुरू झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हस्ते उद्घाटन झालेली ही गाडी सुरुवातीस आठवड्यात दोन वेळा धावत असे. ही सप्ताहात तीन वेळा धावत होती. सन १९८२ मध्ये एशियन खेळ झाले तोपर्यंत ती त्याच वेळा देत होती. जून १९८८ मध्ये माधवराव शिंदिया यांनी या ट्रेनला ग्वालियर थांबा देऊन तिची दैनदिन सेवा चालू केली. भारतीय रेल्वेच्या संचातील ही अतिवेगवाण ट्रेन आहे.या गाडीचा क्रमांक १२६२१/१२६२२ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तमिळनाडू एक्सप्रेस
थोडक्यात पण महत्त्वाचे.