चारमिनार एक्सप्रेस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चारमिनार एक्सप्रेस

चारमिनार एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची चेन्नई व हैदराबाद ह्या शहरांदरम्यान धावणारी जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असलेली चारमिनार एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल व हैदराबाद ह्या स्थानकांदरम्यान दररोज धावते. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणा ह्या राज्यांमधून धावणारी चारमिनार एक्सप्रेस चेन्नई ते हैदराबाद दरम्यानचे ७९० किमी अंतर सुमारे १४ तासात पार करते. ह्या गाडीला हैदराबादेतील प्रसिद्ध वास्तू चारमिनारचे नाव देण्यात आले आहे.

चारमिनार एक्सप्रेस ट्रेन ही भारत देशाचे दक्षिण मध्य रेल्वेची अतिशय प्रतिष्ठित व प्रसिद्ध ट्रेन आहे. ही चेन्नई ते हैद्राबाद दरम्यान दररोज धावनारी सुपर फास्ट एक्सप्रेस आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →