अमृतसर–नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस

यामागील विज्ञान आणि इतिहास.

१२०१३/१२०१४ अमृतसर शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक जलद प्रवासी सेवा ( सुपर फास्ट एक्सप्रेस ) आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित श्रेणीमधील एक असलेली ही गाडी पंजाबच्या अमृतसर ते नवी दिल्ली दरम्यान दर दिवशी धावते. या ट्रेनचा न्यू दिल्ली ते अमृतसर जंक्शनचा 12013 हा क्रमांक आणि अमृतसर जंक्शन ते न्यू दिल्ली या ट्रेनचा 12014 हा क्रमांक आहे. या ट्रेनचा निर्गमन स्थानक ते आगमन स्थानक प्रवास 448 किमी(278मैल) आहे आणि त्यामध्ये 6 थांबे आहेत. क्रमांक 12013 ही न्यू दिल्ली अमृतसर ट्रेन तिच्या प्रवासासाठी 6 तास 5 मिनिटे आणि क्रमांक 12014 ही ट्रेन अमृतसर ते न्यू दिल्ली या प्रवासासाठी 6 तास 15 मिनिटे वेळ घेतात. या ट्रेनचा विश्रांतीचे वेळेसह सरासरी तासी कमाल 140 किमी(87मैल) आणि किमान 72.65 किमी (45मैल) वेग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →