अवध आसाम एक्सप्रेस

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१५९०९/१५९१० अवध आसाम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी आसाम राज्याच्या दिब्रुगढ शहराला राजस्थानमधील लालगढ ह्या गावासोबत जोडते. उत्तर पूर्व सीमा रेल्वे विभागाद्वारे चालवली जाणारी ही गाडी रोज धावते व ३,०३७ किमी अंतर ६७ तास व १५ मिनिटात पार करते.

आजच्या घडीला अवध आसाम एक्सप्रेस भारतामधील सर्वाधिक अंतर कापणारी दैनंदिन सेवा आहे. ही गाडी आसाम, नागालॅंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, पंजाब, आणि राजस्थान या ९ राज्यांमधून धावते. उत्तर प्रदेशाच्या अवध भागातून ही गाडी धावत असल्यामुळे तिला अवध आसाम एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →