पानी फाउंडेशन ही २०१६ मध्ये ना-नफा तत्त्वावर स्थापन झालेली संस्था. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला पाण्याच्या तीव्र दुष्काळाशी सामना करता यावा, यासाठी सत्यमेव जयते ह्या टीव्ही मालिकेच्या टीमने पुढाकार घेतला. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे, त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी लोकांनीच प्रयत्न करायला हवेत, म्हणूनच, या दुष्काळाला पळवून लावण्यासाठी ह्या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रशिक्षित करण्यासाठी संवादाचे माध्यम पुरवणे, हे पानी फाउंडेशनचे लक्ष्य आहे. पानी फाउंडेशन सध्या जलसंधारण (शास्रशुद्ध पाणलोट व्यवस्थापन), नेतृत्वगुण आणि समाजबांधणी/संघटन या विषयांबाबत प्रशिक्षण देत आहे. महाराष्ट्रातील जवळपास ९०% दुष्काळी भागात पानी फाउंडेशनचे काम सुरू आहे. प्रशिक्षणात पाणलोट व्यवस्थापनाविषयी शिकलेली कौशल्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी गावकऱ्यांना दिलेली प्रेरणा म्हणून २०१६ यावर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेची निर्मिती झाली. २०१९ या वर्षातली वॉटर कप स्पर्धा ८ एप्रिल ते २७ मे या कालावधीत घेण्यात आली.
पाणी फाऊंडेशन (हिंदी: पानी फ़ाउंडेशन) ही महाराष्ट्र राज्यातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ साली स्थापन केलेली ना–नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. पाणी फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ (दिग्दर्शक : सत्यमेव जयते) आहेत. महाराष्ट्रातील बरीच गावे या स्पर्धेत उतरली आहेत.पाणी फौंडेशन तर्फे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये काम चालू आहेत.
पाणी फाउंडेशन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!