सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा आहे. स्पर्धेचा पाया हा ज्ञान आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थीना 'पानी फाऊंडेशन’ पाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण देते. त्यानंतरच हे गावकरी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत भाग घेतात. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करतात.

विजेत्या गावांपैकी प्रथम क्रमांकाला ७५ लाख, द्वितीय क्रमांकाला ५० लाख आणि तृतीय विजेत्याला ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →