पहेला वैशाख (बंगाली: পহেলা বৈশাখ) हा पश्चिम बंगाल व बांगलादेश मध्ये १४ किंवा १५ एप्रिल रोजी साजरा होणारा दिवस आहे. बंगाली कालगणनेचा हा पहिला दिवस असतो.या दिवशी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश येथे शासकीय सुट्टी असते. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागात जेथे बंगाली संस्कृती जपली जाते तेथे हा दिवस धार्मिक उत्सव स्वरूपात साजरा केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पहेला वैशाख
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.