नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष किंवा नवीन दिनदर्शिका सुरू होण्याची वेळ किंवा दिवस. या दिवसापासून वर्षाची मोजणी एका अंकाने वाढत.
बऱ्याच संस्कृतीत हा कार्यक्रम काही प्रमाणात साजरा करतात. सर्वत्र सध्या प्रचलनात असलेल्या ग्रेगरीय दिनदर्शिकेत, १ जानेवारी हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून चिन्हांकित केला जातो. जुलियन दिनदर्शिका आणि रोमन दिनदर्शिकेतही १ जानेवारी हाच नवीन वर्षाचा दिवस होता.
इतर संस्कृती त्यांचा पारंपारिक किंवा धार्मिक नवीन वर्षाचा दिवस त्यांच्या स्वतःच्या रुढीनुसार पाळतात आणि कधीकधी नागरी दिनदर्शिकेतील (ग्रेगोरियन) १ जानेवारी हा दिवसपण साजरा करतात. चीनी नववर्ष, मुस्लिम नवीन वर्ष, पारंपारिक जपानी नवीन वर्ष आणि ज्यू नवीन वर्ष (रोश हशाना) ही अधिक सुप्रसिद्ध उदाहरणे आहेत. भारतात आणि इतर देशांत वेगवेगळ्या तारखांवर नवीन वर्ष साजरे केले जाते. भारतातील अनेक राज्यांत पण नवीन वर्षाचे दिवस वेगवेगळे आहेत.
मराठी, कोंकणी, कन्नड व तेलुगू भाषिक भागांमध्ये हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा होतो.
नवीन वर्ष
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.