विक्रम संवत ही सम्राट विक्रमादित्याने निर्माण केलेली दिनदर्शिका आहे. पंचांगात याचा वापर होतो. यामध्ये चांद्र व सौर या दोन्ही वर्षगणनांचा उपयोग करण्यात आलेला आहे. नेपाळमध्ये ही दिनदर्शिका शासनामार्फत अधिकृतरीत्या वापरली जाते. सम्राट विक्रमादित्याने शकांवरील विजयानंतर ही दिनदर्शिका सुरू केली. त्यावेळी नवीन विक्रम संवत्सर (=वर्ष) हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होत असे. सध्या, उत्तरी भारतात नवीन विक्रम संवत्सर हा चैत्र कृष्ण प्रतिपदेला सुरू होतो. पुराणानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला विश्वाचा निर्माता ब्रह्मदेवाने हे जग निर्माण केले. त्यामुळे ही तिथी ‘नव संवत्सर’ उत्सव म्हणूनही साजरी केली जाते. हा कृष्णपक्ष शुक्लपक्षाच्या आधी येतो. गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. विक्रम संवत्सर (=वर्ष) हे ग्रेगरियन म्हणजे इंग्रजी सनाच्या आकड्यापेक्षा ५६ने अधिक असते. म्हणजेच इ.स. २०१४ हे विक्रम संवत २०७० होय. जेव्हा विक्रम वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होते तेव्हा चैत्रातल्या पाडव्यापासून ते ३१ डिसेंबरपर्यंत विक्रम संवत इसवी सनापेक्षा ५७ने अधिक असतो. १ जानेवारी ते फाल्गुन अमावास्येपर्यंत हा फरक ५६चा असतो.
ज्या ग्रहावर नवसंवत्सर सुरू होतो, त्या वर्षातील अधिपती ग्रहाला वर्षाचा राजा म्हणतात. चैत्र महिन्यातच पीक काढले जाते आणि नवीन धान्यही घरात येते. विक्रम संवतला नवसंवत्सर असेही म्हणतात. या काळात आदिशक्ती दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या काळात लोक उपवास करतात. श्री दुर्गा मंदिरात विशेष पूजा केली जाते. भजन कीर्तन व रात्र जागरण केले जाते.
विक्रम संवत्सर
या विषयातील रहस्ये उलगडा.