पंचांग

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती यात असते म्हणून या कोष्टकाला पंचांग म्हणतात.

पंचांगात वर दिलेल्या पाच बाबींशिवाय आणखीही बरीच माहिती असते. यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय माहिती व ज्योतिष्यांना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह-मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा, रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहिती, धार्मिक कृत्यांविषयीचे निर्णय आदी गोष्टी पंचांगांत सापडतात. पंचांगात हिंदूंव्यतिरिक्त अन्य भारतीयांच्या दैनंदिन कालगणनेची थोडक्यात दिलेली माहितीदेखील असते. भारतीय राष्ट्रीय पंचांग हे हिंदूंच्या पंचांगांपेक्षा काही बाबतीत वेगळे असते.

पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले.

तसेच पंचांगात अनेक धार्मिक व सामाजिक रुढी/विधी/परंपरा आदींविषयी विवेचन असते. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे -



अवकहडा चक्र

अशौच निर्णय

कोकणस्थ, कऱ्हाडे आणि क्वचित्‌ देशस्थ ब्राह्मणांची आडनावे आणि गोत्रे, वंशावळी

गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके

गर्भाधान संस्कार

गुणमेलन

गृहप्रवेश

ग्रह उपासना

ग्रहदशा

ग्रहपीडा

रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती

ग्रहांच्या अंतर्दशा

चंद्र व सूर्य यांचे उदयास्त, नक्षत्रभ्रमण आणि त्यांची ग्रहणे

जत्रा

ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेली ग्रहगती

दाने व जप

धर्मशास्त्रीय शंका समाधान

नवग्रह स्तोत्र

नवमांश

नांगरणी-पेरणीपासून ते धान्य भरण्यापर्यंत

बारसे

पायाभरणी

मासिक भविष्य

भूमिपूजन

मकरसंक्रांत

मुंज/उपनयनसंस्कार

मुहूर्त

यात्रा

राजकीय व सामाजिक भविष्ये

राशींचे घातचक्र

लग्नसाधन

वार

वास्तुशांती

व्रत वैकल्ये

विवाह

९६ कुळी मराठा समाजातील वंश, गोत्र, देवक

शाखा उपशाखा

सण

संतांची जयंती व पुण्यतिथी

हवामान व पर्जन्यविचार, इत्यादी.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →