मंगळ (ज्योतिष)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मंगळ हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. मंगळाला चवथी, सातवी आणि आठवी दृष्टी असते. मंगळ हा पापग्रह आहे. १, ४, ७, ८ अथवा १२ व्या स्थानी मंगळ स्वराशिवा अथवा उच्च राशिचा मंगळ असेल तर तो अपवादात्मक ठरतो. तसेच कर्क, सिंह राशीना मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो. त्यामुळे कर्क अथवा सिंह लग्नाच्या कुंडलीत मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो.

ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.



अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश.

प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश;

बाधस्थान : सप्तम स्थान;

अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन;

प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ;

मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरू; शत्रु ग्रह: बुध;

सम ग्रह ; शुक्र व शनि.

नवीन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्षल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण )

मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.

मूल त्रिकोण राशी - मेष,

मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश,

स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश;

उच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ;

नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश;

मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज,

संख्या - ९,

देवता- कर्तिकेय;

अधिकार- सेनापती;

दर्शकत्व - शारीरिक बल;

शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण;

शरीरांगर्गत धातू - मज्जा;

तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व ज्ञान होणारा असा रुपविषय;

कर्मेन्द्रिय - हात;

ज्ञानेन्द्रिय - नेत्र,

त्रिदोषांपैकी दोष - पित्त,

त्रिगुणापैकी गुण- तमोगुण,

लिंग पुरुष;

रंग- लालभडक,

द्र्व्य- सुवर्ण; धातू लोखंड.

निवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर;

दिशा - दक्षिण;

जाती क्षत्रिय;

रत्न - पोवळे;

रस - कडू,

ऋतू - ग्रीष्म,

वय - बाल ४ वर्षेपर्यंत;

दृष्टी - ऊर्ध्व;

उदय - पृष्ठोदय;

स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले,

भाग्योदय वर्ष २८ वे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →