'संवत्सर (संवत) हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास 'चांद्र वर्ष' असेही म्हणतात. गुढी पाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते.
संवत्सर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र असेही एक कालमापन आहे.
शालिवाहन शकाखेरीज अन्य बरीच संवत्सरे आहेत. त्यांची यादी या लेखाच्या शेवटी दिली आहे.
६० वर्षांत सूर्याभोवती गुरूच्या ५ आणि शनीच्या २ प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूच्या प्रदक्षिणेचा १/१२ काळ म्हणजे एक संवत्सर होय. गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ११.८६२६ (सुमारे १२) वर्षे लागतात. म्हणजे १ संवत्सर म्हणजे ०.९८८५५ वर्ष होय. या फरकामुळे ८६ संवत्सरांमध्ये ८५ वर्षे पूर्ण होतात. जर संवत्सर आणि वर्षामध्ये एकास एक संबंध जोडायचा असेल तर ८५ वर्षांत एका संवत्सराचा लोप करावा लागतो.
संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो. सम्यक् वसन्ति मासादया:अस्मिन् (ज्यात मास आदी विभाग व्यवस्थित सामावतात त्याला संवत्सर असे म्हणतात).
संवत्सर
थोडक्यात पण महत्त्वाचे.