चिनी नववर्ष

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

चिनी नववर्ष

सिअ‍ॅटल

चिनी नववर्ष हा चिनी संस्कृतीतील सर्वांत मोठा सण आहे. चीनमध्ये हा सण "वसंतोत्सव" म्हणूनदेखील ओळखला जातो. चिनी दिनदर्शिकेनुसार या काळात शिशिर ऋतूचा शेवट होऊन उन्हाळ्याची सुरुवात होते. उत्सवाची सुरुवात नवीन महिन्याच्या (चिनी: 正月; फीनयीन: : Zhēngyuè) पहिल्या दिवशी होते आणि १५ व्या दिवशी कंदील उत्सवाने समारोप होतो. नववर्षाच्या सायंकाळी, चिनी कुटुंबे वार्षिक सहभोजनासाठी (चिनी: 除夕 ; फीनयीन: Chúxī ) एकत्र जमतात. चिनी दिनदर्शिका चंद्र आणि सूर्याच्या गतीवर आधारित असल्यामुळे चिनी नववर्ष हे "चांद्रमासिक नववर्ष" म्हणून ओळखले जाते.

चिनी नववर्ष हा चीनमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवाची सुरुवात काही शतकांपूर्वी झाली असून अनेक चिनी कथा आणि परंपरांमुळे या उत्सवाचे महत्त्व उत्तरोत्तर वाढतच राहिले. चिनी नववर्ष हे जगभरात चिनी लोकसंख्या अधिक असणाऱ्या देशा-प्रदेशांमध्ये साजरा केला जातो. चीनचे जनता प्रजासत्ताक, हाँग काँग, मकाऊ, तायवान, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिशस, फिलिपिन्स, व्हिएतनाम, आणि जगभरातील चायना टाउनांमध्ये साजरा केला जातो. चीनच्या शेजारी देशांमध्येही या उत्सवाचा प्रभाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →