पतेती

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस होय. मुळात पतेती म्हणजे "पश्चात्तापाचा दिवस" (पेटेटचा अर्थ "कबुलीजबाब" असा आहे). हा खरोखर आत्मनिरीक्षणाचा दिवस आहे आणि मूलतः पारसी वर्षाच्या शेवटच्या दिवशी (किंवा शेवटच्या ५ दिवसांवर) पतेती साजरा केला जात असे. कालांतराने नवीन वर्षाचा दिवस म्हणून (पहिल्या दिवशी) साजरा केला जाऊ लागला. नाव कायम ठेवले असले तरी आता पटेटी हा आत्मपरीक्षणाचा दिवस राहिलेला नाही. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोज किंवा जमशेदी नवरोज असे म्हणून ओळखला जातो. पारशी समाज हा भारतातील एक लहान समाजगट आहे. मुळातून पर्शिया म्हणजे इराणमधूनहा समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे पती हा फारशी धर्मीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण साजरा करतात. दिनदर्शिकेनुसार पारशी वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला नवरोज (नवी सृष्टी) म्हणले जाते. या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →