आलेला बहर.]]
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.
भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबरनंतर) सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात. मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.
वसंत पंचमी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.