वैशाखी किंवा बैसाखी भारतातील पंजाब येथील साजरा करणारा एक रब्बी हंगामाचा सण आहे. हा सण शेतात कापणी करण्यावेळी साजरा केला जाते. हा सण १३ किंवा १४ एप्रिलला साजरा केला जातो.वैशाखी किंवा बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे. या दिवशी शीख संप्रदायाचे नवीन वर्षही सुरू होते. इ.स. १६९९ मध्ये गुरू गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा हा स्थापना दिवस म्हणूनही ओळखला जातो. हिंदू धर्मात तसेच शीख धर्मात वसंत ऋतूतील कापणीच्या हंगामाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. हिंदूंमध्ये वैशाखीला सौर कालगणनेनुसार नव्या वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.,
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वैशाखी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.