जुर शीतल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जुर शीतल

जुर शीतल हा नेपाळमधील आणि विशेषतः मिथिलेतील नववर्ष स्वागताचा दिवस आहे. वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी शितला देवीच्या प्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जात असे. ही देवता कांजिण्या, ताप या आजारांची देवता मानली गेली आहे. हे आजार होऊ नयेत म्हणून तिला प्रार्थना केली जाते.

नेपाळखेरीज मिथिला, बिहार या प्रदेशातदेखील हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. होळीच्या उत्सवासारखेच याचे स्वरूप असते. खाणे, पिणे, नृृृृत्य करणे यातून उत्सवाचा आनंद नागरिक घेतात. मिथिलेतील ब्राह्मण वर्गात या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →