पहिले इंग्रज-मैसूर युद्ध (मराठी नामभेद: पहिले ब्रिटिश-मैसूर युद्ध ; इंग्रजी: First Anglo-Mysore War, फर्स्ट ॲंग्लो-मायसोर वॉर) हे म्हैसूरच्या राज्याचा शासक हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये इ.स. १७६७ ते इ.स. १७६९ या कालखंडात घडलेले युद्ध होते. उत्तरी सरकारांवर वर्चस्व वाढवण्याचे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हैदराबादचा निजाम दुसरा आसफजाह अली खान याच्या चिथावणीमुळे या युद्धाची ठिणगी पडली. इ.स. १७६९ साली दोन्ही पक्षांनी मद्रासचा तह करून हे युद्ध थांबवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पहिले इंग्रज-मैसूर युद्ध
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.