पश्चिम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते पंजाबच्या अमृतसर स्थानकांदरम्यान रोज धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या पश्चिम एक्सप्रेसला मुंबई ते अमृतसर दरम्यानचे १,८२१ किमी अंतर पार करायला ३१ तास लागतात. या ट्रेनचा डाउन क्रमांक १२९२५ आणि अप क्रमांक १२९२६ आहे. ही ट्रेन आठवड्यातील सातही दिवस धावते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पश्चिम एक्सप्रेस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?