न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६

न्यू झीलंड क्रिकेट संघाने १९ ते ३१ ऑगस्ट २०१६ दरम्यान २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला कोपराला झालेल्या दुखापतीमुळे ए.बी. डी व्हिलियर्स ऐवजी फाफ डू प्लेसीने कर्णधार पदाची धूरा सांभाळली.

डर्बन येथील पहिली कसोटी ही दक्षिण आफ्रिकेची उन्हाळ्यात सर्वात लवकर खेळवली गेलेली कसोटी होती. याआधी दक्षिण आफ्रिकेमध्ये सप्टेंबरमध्ये सुद्धा कसोटी खेळवली गेली नव्हती. याआधी सर्वात लवकर सुरू झालेली कसोटी, १९०२-०३ च्या मोसमात जोहान्सबर्गमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ ऑक्टोबर १९०२ रोजी सुरू झाली होती.

पहिली कसोटी पावसामुळे वाया गेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी २०४ धावांनी जिंकून मालिकेत १-० असा विजय मिळवला. हा न्यू झीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सलग पाचवा मालिका विजय.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →