नोवोकुझ्नेत्स्क (रशियन: Новокузнецк) हे रशिया देशाच्या केमेरोवो ओब्लास्तमधील सर्वात मोठे शहर आहे. नोवोकुझ्नेत्स्क शहर सायबेरियाच्या दक्षिण भागात तोम नदीच्या काठावर वसले आहे. २०१६ साली येथील लोकसंख्या सुमारे ५.५१ लाख होती. १९३२ ते १९६१ दरम्यान हे शहर स्तालिन्स्क ह्या नावाने ओळखले जात असे. १९३० च्या दशकात नोवोकुझ्नेत्स्कचे मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नोवोकुझ्नेत्स्क
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.