सिडनी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सिडनी

सिडनी हे ऑस्ट्रेलिया देशामधील सगळ्यात मोठे शहर व आर्थिक राजधानी आहे. तसेच हे शहर न्यू साउथ वेल्स ह्या राज्याची राजधानी देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सिडनीची लोकसंख्या ४६ लाखांहून अधिक आहे.

सिडनी शहराची स्थापना जानेवारी २६, इ.स. १७८८ रोजी आर्थर फिलिपने केली. सुरुवातीला हे शहर म्हणजे ब्रिटिश कैद्यांची वस्ती होते. सध्या ऑपेरा हाउस व सिडनी हार्बर ब्रिज ही जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे असणारे सिडनी हे एक आघाडीचे जागतिक शहर आहे. येथील सिडनी क्रिकेट मैदान प्रसिद्ध आहे. सिडनी २६व्या ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →