सिडनी क्रिकेट मैदान (Sydney Cricket Ground) हे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. १८५४ साली बांधण्यात आलेले व एस.सी.जी. ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले हे स्टेडियम क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते. १९८८ साली स्टेडियम ऑस्ट्रेलिया बांधले जाण्यापूर्वी हे सिडनीमधील सर्वात मोठे स्टेडियम होते. येथे क्रिकेट व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फुटबॉल, रग्बी लीग, रग्बी युनियन ह्या खेळांचे सामने देखील होतात. १९९२ व २०१५ ह्या दोन्ही विश्वचषक स्पर्धांचे प्रत्येकी एक उपांत्य फेरीचे सामने येथे खेळवले गेले होते.
एस.सी.जी.वर आजवर अनेक ऐतिहासिक क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत व अनेक खेळाडूंनी येथे विक्रम प्रस्थापित केले आहेत. १९२८–२९ च्या हंगामामध्ये न्यू साउथ वेल्सकडून खेळताना डॉन ब्रॅडमनने येथे एका कसोटी सामन्यात ४५२ धावां काढण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.
शेन वॉर्न आपला पहिला (१९९२) व अखेरचा (२००७) कसोटी सामने येथेच खेळला होता. २५ नोव्हेंबर २०१४ रोजी येथे एका प्रथम-श्रेणी सामन्यामध्ये फलंदाजी करताना डोक्याला चेंडू लागून फिलिप ह्यूजचा मृत्यू झाला.
सिडनी क्रिकेट मैदान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.