के.डी. सिंह बाबू स्टेडियम (लखनौ)

या विषयातील रहस्ये उलगडा.

के.डी. सिंह बाबू स्टेडियम (लखनौ)

लखनौचे के.डी. सिंग बाबू स्टेडियम, हे पूर्वी सेंट्रल स्पोर्ट्‌स स्टेडियम म्हणून ओळखले जात असे. ह्या स्टेडियमला लोकप्रिय भारतीय हॉकी खेळाडू के.डी. सिंग ह्याचे नाव देण्यात आले आहे.

सदर मैदान १९५७ साली तयार झाले. लखनौ शहराच्या मध्यभागी वर्दळीच्या हजरतगंजनजीक हे मैदान वसलेले आहे. मैदानाची आसनक्षमता २५,००० इतकी असून दिवस-रात्र सामन्यांसाठी लागणारी प्रकाशदिव्यांची सोय ह्या मैदानावर नाही. हे मैदान उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे होम ग्राउंड आहे. मैदानावर स्थानिक सामने नियमितपणे होतात. ह्या मैदानावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळवले गेले आहेत, त्याशिवाय सदर मैदान स्थानिक आणि काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठीसुद्धा वापरले गेले आहे. ह्या मैदानावर असोसिएशन फुटबॉल सामने खेळवले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →