भारतीय क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेल्या क्रिकेट खेळाडूंची ही यादी आहे. सदर यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या पुरुष, महिला आणि युवा संघांच्या सर्व कर्णधारांचा समावेश आहे. ३१ मे १९२६ रोजी भारत, इंपिरियल क्रिकेट कॉन्फरन्स (आताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती)चा सदस्य बनला. २५ जून १९३२ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंडनंतर भारत सहावे कसोटी खेळणारे राष्ट्र बनले. दुसऱ्या महायुद्धाआधी भारत फक्त ७ कसोटी सामने खेळला, ते सर्व इंग्लंडविरुद्ध, ज्यामधील ५ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला तर २ सामने अनिर्णित राहिले. इतर प्रतिस्पर्ध्यासोबत त्यांचा पहिला सामना झाला तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या इनव्हिन्सिबल्सविरुद्ध (ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला त्यावेळे दिले गेलेले नाव).
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी
या विषयावर तज्ञ बना.